बजेट सादर होताचं ,सेन्सेक्समध्ये उसळी!

मुंबई- देशाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.  अर्थसंकल्प सादर होताच सेन्सेक्समध्ये जवळपास ९०० अंकांनी उसळी मारली आहे. त्यामुळे शेअर बाजाराकडून आजच्या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलं आहे.

 

सध्या सेन्सेक्स ८७९ अंकांच्या उसळीसह ५८ हजार अंकांच्या जवळपास आहे. तर निफ्टीने देखील २०० अंकांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. र्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत झाले आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान सन फार्मा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये चांगला खरेदीचा कल दिसून आला.

 

Share