‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ मध्ये झळकणार जनाई

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आज 90 व्या वर्षीही आपल्या आवाजानं रसिकांच्या मनावर गारुड घालतात. त्यांनी आजवर फक्त बॉलिवूडचं नाही तर इतर भाषांत देखील अनेक गाणी गायली आहे.फिल्म इंडस्ट्रीतील इतर स्टारकिड्सप्रमाणे आता जनाई देखील चित्रपटसृष्टीत आपलं नशीब अजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. आशा भोसलेंसोबत ती अनेक कार्यक्रमात सहभागी झालेली दिसते.जनाई सुंदर दिसतेच शिवाय तिचा आवाजही आपल्या आजीप्रमाणे सुंदर आहे. आता जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. जनाईचा पहिला चित्रपट हा इतिहासकालीन असून त्याची नुकतीच घोषणा झाली आहे. कोणता आहे हा सिनेमा जाणून घ्या,

संदीप सिंग जनाई या चित्रपटात शिवरायांच्या पत्नीची म्हणजेच महाराणी सईबाई यांची भूमिका साकारणार आहे. आशा भोसले यांच्याप्रमाणेच जनाई ही एक उत्तम गायिका आहे. तिला संगीताची आवड आहे. शिवाय, ती एक उत्तम डान्सर देखील आहे. जनाईच्या या गुणांचाच विचार करून, राणी सईबाई भोसलेंच्या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ असं आहे.

Share