मुंबैकराची ईडापीडा टळानं दे! शेलारांचे भराडी देवीला साकडे

मुंबई- राज्यात नवाब मलिकांच्या अटकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये  चांगलीच जुंपलेली असताना मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजप नेते  आशिष शेलारांनी मात्र भराडी देवीला साकडे घालत  २५ वर्षांपासून लूटणाऱ्या या विरोधकांपासून जनतेला वाचव असं म्हणत ट्विट केलं आहे.

आशिष शेलारांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, भराडी माते कौल दे .यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीत यश येऊ दे. टक्केवारी , लुटमार करणाऱ्यांना या निवडणूकीत हरवण्याच बळ दे. मुंबईकरांची ईडापीडा टळू दे, या वेळेस २५ वर्ष भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरात बसव आणि सामान्य नागरिकांचे हाल करणाऱ्यांची योग्य ती जागा दाखवण्याचं बळ या निवडणूकी दरम्यान दे, असं कोकणी भाषेत शेलारांनी ट्विट करत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे.

यंदाच्या निवडणूकीत मुंबई महानगरपालिका निवडणूकीची जबाबदारी आशिष शेलारांना देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील निवडणूकीचे भाजप नियोजन करणार आहेत. तसेच त्यांची रणनीती काय असणार आहे  याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

 

Share