जगातील अव्वल टेनिसपटू बार्टीची अवघ्या २५व्या वर्षी निवृत्ती

आंतरराष्ट्रीय-   जगातील अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टी  हिने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. या बातमीमुळे क्रीडा जगतातसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि जड अंतःकरणाने टेनिसला अलविदा करत असल्याचं म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ash Barty (@ashbarty)

कारकिर्दीच्या शिखरावर असताना अ‍ॅश्ले बार्टीने निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. गेल्या तीन वर्षांत तिने आपल्या कारकिर्दीतील तीन ऐतिहासिक ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सर्वप्रथम तिने २०१९ मध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर २०२१ मध्ये विम्बल्डन आणि त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते.

बार्टीची कारकिर्द- 

अ‍ॅश्ले बार्टीने २०१४ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सिनियर टेनिस खेळायला सुरुवात केली होती. २०१४ च्या यूएस ओपनमध्ये ती हरली होती. त्यानंतर ती क्रिकेटकडे वळली. मात्र, २०१६ मध्ये ती पुन्हा टेनिसमध्ये परतली आणि २०१७ मध्ये तिने मलेशियन ओपनच्या रूपाने पहिले WTA विजेतेपद जिंकले. आता तिच्या नावावर तीन ग्रँडस्लॅम व्यतिरिक्त, WTA मध्ये १५ सिंगल्स आणि १२ डबल्स टायटल आहे. ती सध्या जगातील नंबर १ टेनिसपटू आहे. अशात तिचा टेनिस सोडण्याचा निर्णय धक्का देणारा आहे. ती सलग ११४ आठवडे जगातील अव्वल टेनिसपडू राहिली असून सर्वाधिक दिवस पहिल्या क्रमांकावर राहणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे.

Share