शिवसैनिकांसाठी वेगळे नियम आहेत? नितेश राणेंचा सवाल

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर  ईडीने  कारवाई केल्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या कारवाईनंतर सत्ताधारी विरुद्ध आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

इतिहास सांगतो…मनोहर जोशी यांना त्यांच्या जावायावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर, बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितले होते. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग तोच नियम इथे लागू होणार? की शिवसैनिकांसाठी वेगेळे नियम आहेत?” असा सवाल आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून उपस्थित केला आहे.

नेमक प्रकरण काय ? 

दरम्यान, नेमकं हे प्रकरण काय आहे, यासंदर्भात ईडीकडून माहिती देण्यात आली आहे. ईडीकडून आज पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटनं खरेदी केलेल्या ११ सदनिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे.

 

Share