भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतने रविवारी निवृत्ती जाहीर केली. या स्टार शटलरने वयाच्या 31 व्या वर्षी तिची कारकीर्द संपवली. प्रणीतने 2019 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. 36 वर्षांनंतर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. हैदराबादच्या या स्टार खेळाडूने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली शानदार कारकीर्द संपल्याची घोषणा केली.
बी साई प्रणीत याने 2008 मध्ये पहिल्यांदा आपली छाप सोडली. प्रणीतने कॉमनवेल्थ यूथ गेम्समध्ये मेन्स डबलमध्ये कांस्य पदक पटाकवलं. त्यानंतर 2 वर्षांनी 2010 साली वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिनशीप एकेरीमध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर प्रणीतने 2016 मध्ये सलग 2 मेडल्स पटकावले. प्रणीतने या वर्षी कारकीर्दीतील एकमेव सुवर्ण पदकही पटकावलं. प्रणीतने भारतात झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सांघिक खेळात गोल्ड मडेलची कमाई केली. तर एशियन टीम चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. तर 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्राँझ मेडल जिंकत इतिहास रचला.