जाणुन घ्या, ‘ग्लोबल टीचर’ डिसले यांच वादग्रस्त प्रकरण

जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिलीय. २०१७ साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.

डिसले गुरुजींवर काय आहेत आरोप
रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता.  काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले गेले

या प्रकरणावर डिसले गुरुजी प्रतिक्रीया

रणजितसिंह डिसले एकावृत्तवाहिणीशी बोलताना म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर खूप मानसिक त्रास झाला. जेवणावळी कराव्या अशी मागणी केली गेली. ते म्हणाले की, २५ जानेवारीला फुलब्राईटसाठी अंतिम कागदपत्रे दाखल करायची आहेत. १४ डिसेंबरला रजेचा अर्ज केला होता, त्यावर अद्याप निर्णय नाही. फुलब्राईट हातातून जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

डिसले म्हणाले की, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क का साधला याचा राग त्यांना आहे. राज्यपालांशी थेट संपर्क झाला, यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला. या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही. झोपही लागत नाही. घरी सगळ्यांशी चर्चा केली आहे. बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित आहे. वारे सर व्हायच्या आधी बाहेर पडणार असल्याचं डिसले गुरुजी म्हणाले.

डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचं आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डिसले सरांसदर्भात मी स्वामींशी बोलले आहे. त्यांना रीतसर परवानगी दिली जाईल. डिसले यांनी प्रोसीजर प्रमाणं अर्ज दिला नव्हता. आता त्यांना प्रक्रियेप्रमाणं कार्यवाही करत परदेशी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. डिसले यांना परवानगी देण्यासंदर्भात मी निर्देश दिले आहेत. तसेच डिसलेंवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?

  • अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप
  •  २०२१ मध्ये जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर
  •  पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
  •  लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
  • याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार
  •  अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे ७५ वे वर्ष आहे.

कोण आहेत डिसले?
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत २००९ साली डिसले शिक्षक म्हणून रूजू झाले. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

२०१७ साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती झाली. तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल विज्ञान प्रयोग शिकवले.  QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम केले.  कार्याची दखल घेत त्यांना  ४ डिसेंबर २०२० रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  जून २०२१ मध्ये वशिंग्टन dc मधील जागतिक बँकेच्या सल्लागर पदी नेमणूक करण्यात आली. १ डिसेंबर २०२१ रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली. या स्कॉलरशिपसाठी डिसले यांना अमेरिकेत जायचे आहे.

Share