शोपियान येथील चकमकीत एक दहशतवादी ठार,इतरांची शोध मोहिम सुरु

जम्मू-काश्मीर- जम्मू -काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून या परिसरात अजून दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जात असल्य़ाने सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहिम सुरु आहे. कालबिल परिसरात शनिवारी सकाळी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली. यानंतर परिसरात तपास मोहीम कडक राबवण्यात आली. यात एका घरात दहशतवादी असल्याचे आढळून आले .या घराला सुरक्षा रक्षकांनी चहू बाजूंनी घेरून चकमकीत त्याला मारण्यात सुरक्षा रक्षकांना यंत्रणेला यश आले आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी श्रीनगरमध्ये साइट शोध आणि लगतच्या परिसरात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांकडून आगामी काळात सातत्याने शोध मोहीम राबवली जात आहे.

 

Share