भाजप प्रवेशपूर्वी हार्दिक पटेल म्हणाले “मी तर मोदींच्या…”

नवी दिल्ली : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हार्दिक पटेल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळांलं आहे.

हार्दिक पटेल आपल्या १५ हजार कार्यकर्त्यांसह दुपारी १२ वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी हार्दिक पटेल यांनी सकाळी ट्विट करत आपण देशसेवेच्या उदात्त कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं म्हटलं आहे.

हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणूनही काम करेन.’

दरम्यान हार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. हार्दिक सौराष्ट्रातील मोरबी किंवा अहमदाबाद जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावामधील विरमगाम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. त्यानं भाजपकडून निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले आहेत.

Share