राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख; राज्यपालांनी बोलून दाखवली खदखद

मुंबई : राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही, अशी खंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्य केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यपाल काल राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यपाल बनणं म्हणजे दुःखच दुखं आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो”, अशी स्पष्टपणे भूमिका राज्यपाल कोश्यारी यांनी माडली.

तसेच “छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक जन्माला यावे, परंतू आपल्या घरात नाही, तर शेजारच्या घरात, अशी लोकांची भावना आहे”, असेही त्यांनी म्हटले. राज्यपालांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राज्यपाल लवकरच महाराष्ट्रातून जातील, त्यांना पदमुक्त केले जाईल, अशा चर्चा रंगत आहेत.

Share