जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

नवजा हेळवाक गोवारे मोरगिरी गारवडे साजूर विंग वाठार रस्ता भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, मोरगिरी पर्यंत राज्यमार्ग होत आहे. एका विनंतीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गासाठी २५ कोटीचा  निधी दिला आहे. हा निधी खर्च झाला की, आणखी निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रस्ते चांगले झाले की विकास होतो. अनेक योजनांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी दिला जातो. जलजीवन मिशन माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठीही निधी आणला आहे. ज्या योजनेतून शक्य आहे त्या योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणला जात आहे. मुख्यमंत्री महोदय हे जिल्ह्याचे पुत्र आहेत. त्यांना जिल्ह्यातील अडचणींची चांगली माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल.

कराड तालुक्यातील गमेवाडी येथे बोलतांना पालकमंत्री देसाई म्हणाले, रस्ते, साकव, पूल, पिण्याचे पाणी अशा सार्वजनिक विकासासाठी गरज असलेली कामे केलीत. ज्या गावांना विकासाची भूख असते त्याच गावांचा विकास होतो. सध्या राज्यात गतीमान सरकार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठीचा निधी वाढविण्यात आला आहे. डोंगरी विकासासाठीही वेगळे पॅकेज देण्यात आले आहे.

मल्हारपेठ येथे बोलतांना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सर्वसामान्यांच्या विकासासाठी मिळालेल्या सत्तेचा व पदाचा वापर केला पााहीजे. राज्यात महसूल मिळवून देणारा तिसऱ्या क्रमांकाचा विभाग म्हणजे उत्पादन शुल्क विभाग आहे. या विभागाचे उत्पन्न वाढविणे हा माझा नेहमीच प्राधान्यक्रम राहिल. राज्याचे उत्पन्न वाढवून त्या माध्यमातून विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देणे हे सरकाराचे उद्दिष्ट आहे. गावांनीही विकासाची कास धरावी.

पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते संपनन झाले. त्यामध्ये २० लक्ष रुपयांच्या गमेवाडी, पाठरवाडी ता.कराड पोहोच रस्ता खडीकरण-डांबरीकरण, मारुलफाटा येथील नवजा, हेळवाक, गोवारे, मोरगिरी, गारवाडी, साजूर, विंग वाठार हा तीन कोटी रुपयांचा रस्ता, मल्हारपेठ ता. पाटण गणेश कॉलनी, मागासवर्गीय वस्ती रस्ता खडीकरण-डांबरीकरण या १५ लक्ष रुपयांचे काम,  दिंडूकलेवाडी (मल्हारपेठ ता. पाटण) पोहोच रस्ता सुधारणा या १० लक्ष रुपयांच्या कामाचे व मल्हारपेठ ते सोंडेवाडी पोहोच रस्त्यावर जि. प. शाळेजवळी संरक्षित भिंत बांधणे या १५ लक्ष रुपयांच्या कामाचे आणि मल्हापेठ येथे सभामंडप बांधणे या १० लक्ष रुपयांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे.

Share