बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी भारताला मोठा धक्का

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाला रविवारपासून बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने आता याला दुजोरा दिला आहे. शमीच्या जागी स्पीड गन उमरान मलिकचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयनं आपल्या निवदेनात असं म्हटलंय की,मोहम्मद शामीला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीच्या सराव सत्रादरम्यान शमीच्या खांद्याला दुखापत झाली. तो सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तीन सामन्यांच्या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही.

भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेश एकदिवसीय संघ:
तमिम (कर्णधार), लिओन, इनामूल, शाकिब, मुशफिकुर, अफिफा, यासिर अली, मेहिदी, मुस्तफिझूर, तस्किन, हसन महमूद, इबादत, नसुम, महमुदुल्ला, शांतो आणि नुरुल हसन.

वन डे मलिका वेळापत्रक
पहिला वन डे सामना ४ डिसेंबर

दुसरा वन डे सामना ७ डिसेंबर

तिसरा वन डे सामना १० डिसेंबर

Share