ठाकरे गटाला मोठा धक्का; १२ माजी नगरसेवक शिंदे गटात

मुंबई : ठाकरे गटाला नाशिक मध्ये मोठा धक्का बसला आहे. ठाकरे  गटातील   १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि माजी स्थायी समिती सदस्य रमेश धोंगडे यांचाही समावेश आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. ठाकरे गटाने मुंबईसह नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा देखील झाला होता. मात्र आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

या माजी नगरसेवकांचा प्रवेश
माजी नगरसेवक अजय बोरस्ते, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, डी. जी. सुर्यवंशी, सुदाम ढेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुळ, ज्योती खोले यांच्यासह अन्य माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Share