मुंबई- राज्यात राजकीय वर्तुळात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु आहेत. रविवारी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला या दरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. या संवादानंतर राज्यभर भाजपकडून शिवसेनेचा विरोध करण्यात येत आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक सवाल उपस्थित केला आहे.
…याकूब मेमनला फाशी नको म्हणणारा मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात कसा? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/wCWwcq9Ow7
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 25, 2022
आशिष शेलार म्हणाले की, दुखःचा प्रसंग आला तेव्हा शिवसेना कुठे होती ? १९९३ साली मुंबईत बाॅम्ब स्फोट घडवून आणला असा याकूब मेमनला फाशीची नको म्हणणारा मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात कसा? तसेच जय श्री रामला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी तुम्हाला नेत्या कश्या वाटतात? सीएए आणि एनआरसीला तुम्ही विरोध का करतात ? तो शर्जील उस्मानी संसदेवर हल्ला करणाऱ्या आणि सुप्रीम कोर्टाने फाशी दिलेल्या अफजल गुरुचं वर्षश्राध्द करतो त्याचं तुम्ही समर्थन करणारे मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात का आहेत ? या सर्व प्रश्नांचे उत्तरे उध्दवजींच्या शिवसेनेने द्यावीत. असे सवाल आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना विचारले आहेत.