मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे अशी मागाणी भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
तातडीने त्यांच्या विनंतीचा भावनेचा सन्मान करावा त्या ठीकाणी जगताला प्रेरणा देणारे #स्मृतीस्थळ बनवावे pic.twitter.com/IufP9Km1Zu
— Ram Kadam (@ramkadam) February 7, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राम कदम म्हणतात, “भारतरत्न दिवंगत लता दिदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. यामुळे त्याच जागी शिवाजी पार्कावर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादिदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन करण्यात याव्या ही नम्र विनंती. मी कोट्यावधी संगीतप्रेमी आणि लतादिदींच्या चाहत्यांच्या वतीने मागणी करत आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याचं ठिकाणी जगला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ उभारावे. तसेच या पत्राच्या शेवटी आपलं नाव लिहिताना त्यांनी राम कदम (लतादिदी चाहता व आमदार, भाजपा) असा उल्लेखही केला आहे.