मुंबई- राज्यात दोन तीन दिवसांपासून एमआयएमने राष्ट्रावादीला दिलेल्या ऑफरमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यातच भाजपने महाविकास आघाडीतील शिवसेनेला लक्ष करत हिंदूत्वाचा नारा दिला होता. काल शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाव्दारे सेनेच्या खासदारांशी चर्चा केली यात त्यांनी भाजपवर जोरदार टिका केली. यावर भाजप आमदार अमित साटम यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
कोन अंगार और कोन भंगार वह समय बताएगा।@OfficeofUT @ShivSena pic.twitter.com/0vpkMdErEC
— Ameet Satam (@AmeetSatam) March 20, 2022
साटम यांनी ट्विट करत म्हंटल आहे की., कोण अंगार आहे किंवा कोण भंगार हे वेळ आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेला समजणार आहे. काल झालेल्या बैठकीत कडव्या शिवसैनिकाचं हिंदूत्व हे अंगार आहे त्यामुळे शिवसेनेवर हिंदूत्वाच्या टिका करणाऱ्यांना आपण दाखवून देवू अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टिका केली होती.
तसेच मुख्यमंत्री म्हणाले की , आम्ही भाजपला सोडलेले आहे, हिंदूत्वाला नाही. त्यामुळे विरोधकांना ओळखा आणि भाजपच्या प्रत्येक टिकेच उत्तर दिलं जाईल असं देखील ठाकरेंनी यावेळी सांगितल आहे.