पणजीः पाच राज्यांच निवडणुका केंद्रीय आयोगाने जाहीर कोल्यानंतर गोव्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिक यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी पाणजीतूण अपक्ष म्हणून निवडणुक लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना दिले आहे.
उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात जाऊ शकता, अशी चर्चा सुरू होती. मात्र, उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यामध्ये उत्पल यांचे नाव नव्हते.पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला असून आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहेत. तशा प्रकारची घोषणा त्यांनी काल केली होती. उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि माझा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा. आतापर्यंत आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभार, असं त्यांनी नारायण राणेंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
गेल्यावेळीही लोकांचे समर्थन असतानाही पक्षाने काही विशिष्ट कारणांमुळे मला तिकीट नाकारले होते. तेव्हापण मी पक्षाचे ऐकले होते. आताचे निर्णय हे पर्रिकरांच्या पक्षातले वाटत नाहीत. त्यामुळे लोकांकरिता मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटलंय.