भाजपने घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे-मलिक

पणजी : गोव्याच्या जनतेने २०१७ च्या निवडणुकीत भाजला नाकारले होते. काॅँग्रेसच्या पारड्यात बहूमत होते. त्यानंतर सत्ता मिळाल्यानंतरही भाजने गोव्यातील जनतेला न्याय दिला नाही, अशी टिका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

गोव्यात भाजपच्या ४० उमेदवारांची यादी पाहिली तर त्यामध्ये सर्व आयात केलेले उमेदवार आहेत. मुख्यमंत्री पदाचा दावेदार सोडला तर सर्व उमेदवार इतर पक्षातील आहेत, असं मलिक म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून १५ वर्ष आघाडीचे सरकार चालवले आहे. मात्र मागील काही वर्षांत काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून जी निर्णयक्षमता दाखवायला हवी, ती दाखवलेली नाही. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून भाजप गोव्यात सत्तेत आहे. असे मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले. पण दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ५६ अशा उमेदवारांना तिकीट दिले आहे, ज्यांचे सगेसोयरे राजकारणात आहेत. तुम्हाला घराणेशाहीचे वावडे आहे तर मग गोव्यामध्ये दोन पती-पत्नीच्या जोड्या निवडणूक कशा काय लढवू शकतात? बाबूश आणि त्यांची पत्नी तसे राणे पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत. मग घराणेशाहीचा ढोल भाजप कधीपर्यंत बडवत राहणार?, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

Share