घरभेदी

शरद पवारांनी आजवर घरभेदी राजकारण केलं आहे. राजकारणात आपल्या पक्षाचं प्राबल्य असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठीचे प्रयत्नही प्रत्येक पक्षाकडुन केले जात असतात.

घरभेदी

महाराष्ट्रः राज ठाकरेंनी पवारांवर एबीपी माझाच्या एका मुलाखतीतुन आरोप केला, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासुन महाराष्ट्राच्या राजकारणातील जातीवाद वाढु लागला आहे. त्याच आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एका पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर मात्र पवार जातीवादी आहेत अशी चर्चा होऊ लागली. पवारांच्या जातीवादी असण्याची अनेक उदाहरणे आहेत. जातीवादी असणं हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही इतक्या वेळा त्यांनी आपला जातीवाद दाखवुन दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी आजवर घरभेदी राजकारण केलं आहे. राजकारणात आपल्या पक्षाचं प्राबल्य असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठीचे प्रयत्नही प्रत्येक पक्षाकडुन केले जात असतात. आपलं, आपल्या पक्षाचं प्राबल्य तेव्हाच राहु शकेल जेव्हा वेगवेगळ्या भागातील बलशाली व्यक्ति कमकुवत ठरतील. "बंद मुठ्ठी लाख की, खुले तो खाक की" असं म्हटलं जातं. एकीचं बळ तोडता येत नाही आणि पवारांनी राजकारणात हे सुत्र अतिशय चाणाक्षपणे पाळलं आहे.

म्हणूनच जी व्यक्ति किंवा राजकीय घराणं प्रभावशाली ठरु शकतं त्यांच्या घरात फुट पाडली जाते. हे अगदी सामान्य कुटुंबांमध्येही केलं जातं. हीच पद्धत महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांनी वापरली आहे. माराठवाड्यात मुंडे परिवरात अशाच पद्धतीने फुट पाडली गेली. धनंजय मुंडेंना संधी मिळणार नाही असं भरवलं गेलं आणि त्यांच्यात फुट पाडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. गेवराईचे शिवाजीराव पंडीत आणि बदामराव पंडीत यांच्यात वाद झाले. या वादानंतर बदामराव बाजुला झाले, राष्ट्रवादीने कधी अमर सिंह पंडीतांना जवळ केलं तर कधी बदामरावांना. त्यामुळे एकत्र असलेल्या पंडीत कुटुंबात फुट पाडली. कदाचित ते गेवराईचे मोठे नेते होऊ शकले असते मात्र पवारांनी त्यांची विभागणी केली आणि त्यांना मर्यादित केलं.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासुन केशरकाकु क्षिरसागर त्यांचे चिरंजीव जयदत्त क्षिरसागर, भारतभुषण क्षिरसागर, रविंद्र क्षिरसागर हा संपुर्ण परिवार पवारांचा एकनिष्ठ होता. या परिवाराला विधानपरिषदेची आमदारकी देऊन नियंत्रीत करण्याची व्यवस्था पवारांनी पुर्वीच करुन ठेवली होती. पण पुढे जयदत्त क्षिरसागर राष्ट्रवादीच्या बाहेर गेले आणि त्यांचे पुतणे संदीप क्षिरसागर पवारांकडे गेले आणि पवारांनी याच कुटुंबात फुट पाडली.

साता-यात भोसले घराण्यामध्ये वाद आहेत. भोसले कुटुंबातील कोणत्या ना कोणत्या सदस्याला कधी आपल्या जवळ करत तर कधी दुर करत पवारांनी ही खेळी साधली आहे. अगदी एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत यांच्यात वाद आहेत. या सगळ्याच कुटुंबातील वाद टोकाचे आहेत हे आपल्याला माहिती असेल.सोलापुरमधील मोहिते पाटलांच घरही पवारांनी फोडलं आहे, औरंगाबादच्या वैजापुरमधील चिकटगावकर ही सगळी कुटुंब पवारांनी फोडली आहेत. त्यांच राजकारणच घरभेदी, घरफोडी असं आहे आणि याच घरभेद्यांना घेऊन त्यांचीच लंका पाडण्याचं काम पवार करत आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक घरात अशा पद्धतीचं घरभेदी राजकारण झाल्याचं आपल्याला दिसेल. या कुटुंबांवर नियंत्रण ठेवत पवारांनी आपल्या पक्षाची वाढ केली आहे. अगदी स्वतःच्या घरातही पवारांनी असंच केलं आहे. कधी अजित पवारांना तर कधी सुप्रिया सुळेंना महत्त्व दिलं आहे, पार्थ पवारांच्या जागी रोहीत पवारांना आणलं गेलं आहे. म्हणजे आपल्या घरातही हीच भुमिका पवारांनी ठेवली आहे.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.