कात्रज सिलेंडर स्फोटा प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल

पुणे-  येथील कात्रज भागात काल घरगुती वापराच्या एकापाठोपाठ एक अशा दहा सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच भीती निर्माण झाली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा नोंदवला असून पोलिस या स्फोटाचा पुढील तपास करत आहेत.

कात्रजच्या गंधर्व लॉन्स परिसरात आतिशय दाट रहिवासी भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये १०० सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. तिथे अचानक स्फोट झाल्याने परिसरातील नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण होते.  अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दल पोहोचण्यासाठी अडचणी आल्या. आगीचे लोट दुरवरुनही दिसत होते. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवितहानी झालेली नाही.

या प्रकरणी कात्रज पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४३६, ३०८ आणि २८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. मालकासह इतर चार जणांवर या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

Share