अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासाठी १०० कोटी निधी- मुख्यमंत्री

मुंबई :  राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मुत्युनंतर एकरतकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतमनीस यांना सेवानिवृत्ती राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मुत्यूनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे. अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.

Share