बँकेच्या वेळापत्रकात करण्यात आला आहे बदल

आजपासून बँकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बँका आता एक तास अगोदर म्हणजे ९ वाजता उघडणार आहे. बँक ९ वाजता उघडणार असली तरी बँक बंद होण्याचा वेळ आहे तीच राहणार आहे. यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच 18 एप्रिल पासून बँका ह्या एक तास आधी सुरु करण्यात याव्यात असा आदेश आरबीआयने दिला आहे.

या निर्णयाचा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे आता बँका सकाळी ९ वाजेपासून सुरू होणार असल्याने लोकांना ऑफिसला जाण्यापुर्वी बँकेची कामे करणे आता शक्य होईल.

करोंना निर्बंधामुळे बँकेचे कामाचे तास कमी करण्यात आले होते पण आता सर्व नियम सामान्य करण्यात आले आहेत. देशात २० पेक्षाजास्त खाजगी बँका आहेत मात्र या नवीन नियम सर्व बँकांना लागू होणार आहे.

Share