मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. आज (मंगळवार) दुपारी तीन वाजता ते जळगावमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते  पाळधी येथील शासकीय विश्राम गृहाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना होतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे  हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

असा असणार एकनाथ शिंदे यांचा दौरा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी दीडला मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानातून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी दोनला जळगावकडे विमानाने प्रयाण, दुपारी तीनला जळगाव विमानतळावर आगमन, दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पाळधी (ता. धरणगाव) येथे आगमन, दुपारी चारला पाळधी येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा, दुपारी साडेचारला पाळधीहून मुक्ताईनगरकडे प्रयाण, सायंकाळी साडेपाचला मुक्ताईनगर येथे आगमन, मुक्ताईनगरातील मैदानावर जाहीर सभा, रात्री सोयीनुसार मोटारीने जळगाव विमानतळाकडे रवाना, तेथून मुंबईकडे प्रयाण.

Share