चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण…

मुंबई : शिवसेना नेत्या दीपाली सय्याद आणि भाजप यांच्यात सध्या शाब्दिक वॉर सुरू आहे. आजही भाजपच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे दीपाली सय्याद यांनी जोरदार टीका केली. “चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही.दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही.पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही”, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. दिपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार प्रहार केला. “दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडगा ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतंय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार”, असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी केलं.

दीपाली सय्यद यांची वादग्रस्त वक्तव्य
पंतप्रधान मोदींवर टीका करताना दीपाली सय्यद यांची जीभ घसरली होती.  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली होती.

तसंच काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बोचरी टीका केली होती. योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?’ असं वादग्रस्त वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केलं होतं.

Share