मुंबै बँके प्रकरणी प्रवीण दरेकरांना क्लीन चीट

मुंबई : भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांना मुंबै बँकेतील घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोप पत्रात प्रवीण दरेकर यांच्या विरोधात कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचे गुन्हे शाखेने म्हटले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांना दिलासा दिला आहे.

काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर हे २००० पासून मुंबै बँकेचे संचालक होते. तसेच ते २०१० पासून बँकेचे अध्यक्ष देखील आहे. २०१५ मध्ये मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली. या घोटाळ्याप्रकरणी विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. १९९८ पासून १२३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी दाखल केलेल्या आरोपत्रामध्ये जवळपास दहा मजूर संस्थांना आरोपी केले आहे. मात्र, दरेकर आणि इतर संचालकांच्या सहभागाबाबत कोणताही पुरावे सापडला नसल्याचे म्हटले आहे. हे आरोपपत्र पोलिसांनी सादर केले असले तरी न्यायालयाकडून यावर स्वीकारल्याची मोहोर मारण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Share