मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला; Eknath Shinde

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. गेल्या काही वर्षात विभिन्न परियोजना मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाल्या विकासाची गाडी वेगाने सुरू आहे. विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी मोठ्या वेगानेने चालतेय. एक गाडी रुळावर उभी राहत नाही तर दुसरी वेगात सुरू आहेत असं शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. लोकार्पण या ठिकाणी होत आहे. भारतीय रेल ही दुनिया मध्ये एक आश्चर्य मानलं जातं. विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान मोदींची गाडी मोठ्या स्पीडने चालते, असं शिंदे म्हणाले. 2014 पर्यंत 4 किलोमीटर रेल्वे रूळ काम होत होतं. आता मात्र 10 ते 15 किलोमीटर वेगाने काम होत आहे. रेल्वेमध्ये अनेक योजना आणल्या, असं देखील  शिंदे म्हणाले.

13 शे करोड रुपयांच्या रेल्वे क्यायोजना महाराष्ट्रात सुरू केल्यास यातून रोजगार उपलब्ध करून दिले. मुंबई आणि महाराष्ट्रातील 56 स्टेशनचं आधुनिकरण होत आहे. लातूरमध्ये रेल्वेचं वंदे भारत ट्रेन तयार होत आहे. विकसित भारत होण्यासाठी महाराष्ट्र मोठं योगदान देत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Share