नवी दिल्ली : सर्वसामान्य व्यक्तीपासून ते अगदी व्हीव्हीआयपी व्यक्तींना कोरोनाचा लागण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास आणि स्टाफमधील एकास करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधी या विलगीकरणात आहेत. प्रियंका गांधी यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
A member of my family and one of my staff have tested positive for COVID-19 yesterday.
I have tested negative today however the doctor has advised that I remain isolated and test again after a few days.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 3, 2022
माझ्या कुटुंबातील एक सदस्य आणि माझा एक कर्मचारी काल कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. माझी चाचणी आज निगेटिव्ह आली आहे. मात्र डॉक्टारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी विलगीकरणात आहे आणि काही दिवसानंतर पुन्हा एकदा तपासणी करून घेणार आहे. असे प्रियंका गांधीनी सांगितले.