मुंबई- नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे देशात कोरोना पसरला, ज्याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवण्याचा आरोप केला त्याला मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कोरोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादले. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी केली आहे. pic.twitter.com/Pony3atLYq
— NCP (@NCPspeaks) February 8, 2022
जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नाही असे सांगितले होते. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले, ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला” असा थेट आरोप मलिक यांनी केला आहेत.
मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट विकले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था केली गेली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही त्यांच्यासाठी फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तरप्रदेश व बिहारचे मजुर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळया वाजवायला लावल्या त्याचा परिणाम लोक आता भोगत आहेत,” असे नवाब मलिक यांनी म्हंटले आहे.