प्रधानमंत्री जी आपसे नाराज नहीं, हैरान हू मैं -सुप्रिया सुळे

दिल्ली-  पंतप्रधान मोदी यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे. मोदींच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक पाहायला मिळतेय.  महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला होता . राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोरोनाची तिसरी लाट ओरसत आहे , चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले आहे. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या .

राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे,” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले. एका पक्षाच्यावतीने पंतप्रधान बोलत होते हे पाहून मला दुखः झाले. पंतप्रधानांचा मान सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यामध्ये पक्ष येत नाही. ते पद पक्षाचे नाही. त्यामुळे कालच्या एकंदर भाषणावरून प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नहीं,हैरान हू मैं असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

Share