सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने

मुंबई :  महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सह्याद्री अतिथीगृह येथे सत्कार केला.

या समितीच्या सदस्यपदी ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर तर विशेष निमंत्रीत्रित म्हणून ॲड. र. वि. पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रित आहेत. सीमा प्रश्नाविषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत. सीमाप्रश्‍नी २००४ मध्ये दावा दाखल झाला. मात्र त्यापूर्वीच तज्ज्ञ समिती स्थापना झाली होती. स्थापनेपासून ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर महाविकास आघाडीने तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांची निवड केली होती.

Share