वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं, विधानसभेत फडणवीसांचा पुन्हा एकदा घणाघात

मुंबई- राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.यात भाषणावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तींची वक्फ बोर्डावर नियुक्ती केल्याचा आरोप करत राज्य सरकारवर घणाघात केला आहे. नवाब मलिकांनी दाऊदच्या व्यक्तींना बोर्डावर कस नियुक्त केल असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आरोप करताना म्हटलं की, मी पेन ड्राईव्ह देतो.  या पेनड्राईव्हमध्ये दोन पात्र आहेत. एक मोहम्मद अर्शद खान आणि दुसरं डॉ. मुदसैर लांबे. ह्यांना नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केलंय. लांबेवर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. मग त्यांनी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. या महिलेच्या पतीने घटस्फोट दिला होता. डॉ लांबे ह्यांनी या महिलेच्या पती विरोधात चोरीची तक्रार केली अन् तो तुरुंगात गेला. डॉ लांबे आणि मोहम्मद अर्शद खान यांच्यात झालेल्या संवादात वक्फ बोर्डामध्ये पैसे कसे कमवायचे अशी चर्चा सुरु असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

 

Share