उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेॅद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्त करण्यात आली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला.

विठ्ठल रुखमाईची महापूजा पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय समाधान आहे की, आज विठू माऊलीची, पांढुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली. हा अतिशय भाग्याचा असा योग आहे. ही पूजा होते ती मनाला शांती देणारी पूजा आहे. पांढुरंगाला नेहमी आमचं एक साकडं असतं कारण हा सामान्य माणसाचा देव आहे. कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत. त्यांचंही जीवन सुजलाम सुफलाम व्हावं. यासाठी कार्य करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना आम्ही पांढुरंगाकडे करत असतो.

राज्याबाहेर चाललेले उद्योग परत यावेत, त्याबद्दल विठू माऊलीला काय सांगितलं? असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही ठिकाणं सोडून द्यायला पाहिजे. अशा ज्या चर्चा आहेत ना, या चर्चांत अशी ठिकाणं सोडून दिली पाहिजे. मंदिर आहे हे. मंदिरात आम्ही कुरघोडीची कामं करत नाहीत”, असं फडणवीस म्हणाले.

Share