मावळ- एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना रविवारी संबोधीत केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या प्रस्तावाबाबतही भाष्य केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
ही त्यांची मिलीजुली कुस्ती आहे,
ते सगळे मिळून खेळताहेत !
पुण्यात माध्यमांशी संवाद… #Pune pic.twitter.com/KWJqaxnr0h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 20, 2022
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मावळमधील इंदूरी येथे सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीला उपस्थिती लावली असताना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत नाहीत. अजान स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते आणि त्यांचे घटक पक्ष हे एमआयएमसोबत जाण्याचा विचार करत आहेत त्यावेळेस आरोपही करणार तेच. ही सगळी मिलीभगत कुस्ती आहे. सगळे मिळून खेळत आहेत,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.