अवैध वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला; पोलिसांकडून हवेत गोळीबार

जालना-  अवैध वाळू माफियाकडून बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव जवळ राजूर-फुलंब्री महामार्गावर रविवारी (ता.२०) पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबारकेला असुन काही संशयित ताब्यात घेतले आहेत.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव जवळील राजूर- फुलंब्री महामार्गवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा ट्रक ताब्यात घेण्यासाठी बदनापूर पोलिस गेले. हा हायवा ट्रक गिरिजा पत्रातून अवैध वाळू घेऊन डोंगरगाव मार्गे दाभाडीकडे येत असल्याची माहिती मिळताच पोलिसानी डोंगरगाव शिवारात हायवा ट्रक अडवल. चालकानी पोलिसांनी हायवा ट्रक अडवल्याची माहिती वाळू माफियांना दिल्यानंतर एका कारमधून आलेल्या दोन महिला आणि चार ते पाच जणांना पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. वाळूमाफियाच्या तावडीत सापडलेल्या पोलिसांना वाचवण्यासाठी सहाय्याक पोलिस निरीक्षक श्री. रामोडे यांनी स्वतःहा हवेत गोळीबार केला.

या हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. रामोडे हे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. बनटेवाड यांनी धाव घेऊन जखमी असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. रामोडे यांना उपचरासाठी दाखल करत आले आहे. मारुती स्वीप्ट कार दोन महिला व चार जणांना दाब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. रामोडे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Share