धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

नवी दिल्ली : न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. महाराष्ट्राचेच मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत.

डी.वाय चंद्रचूड २९ मार्च २००० रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश यू यू लळीत यांच्या निवृत्तीनंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड नोव्हेंबर २०२२ पासून भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून काम करतील. ते भारताचे १६ वे आणि सर्वाधिक काळ काम करणारे माजी सरन्यायाधीश, न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. लळीत यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केली होती.

Share