ठाकरेंना धक्का; दीपाली सय्याद शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई : ठाकरे गटातील नेत्या दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहे. स्वत: दीपाली सय्यद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल, असं दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अखेर शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळं या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होणार, असंही दिपाली सय्यद यांनी जाहीर केलं आहे.

Share