दिलासा की, खिशाला कात्री? जाणून घ्या इंधनाचा लेटेस्ट भाव

मुंबई : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशात सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, यापूर्वी २१ मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली होती. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झालं होतं.

देशातील महानगरांतील किमती काय?

आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत १०६.०३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share