‘डॉक्टर मारायच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका’ – संभाजी भिडे

अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असताता. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्या केले आहे. याआधी न्यायाधीशांवर वक्तव्य करणाऱ्या भिडे यांनी आता डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.  डॉक्टर हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे असल्याचे भिडे यांनी म्हटले.  या वक्तव्यामुळे डॉक्टर संघटना आक्रमक होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोरोनात १०५ टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही भिडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी डॉक्टरांबाबत अपशब्द वापरले. तसेच  यापूर्वीही भिडे यांनी कोरोना आणि मास्कबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.  कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे, असे भिडे म्हणाले होते. हातावरची माणसे उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचे काम सुरु आहे, असे भिडे म्हणाले होते. तसेच कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

https://fb.watch/btxpn0qmS5/

संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी या आधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे भिडे यांनी म्हटले.

 

Share