महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको- संजय राऊत

नवी दिल्ली : राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं. तसेच, शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात पाचवेळा दिल्लीत यावे लागते. राज्यात पूरपरिस्थीती आहे. फक्त दोघांचेच कॅबिनेट सुरु आहे. या गटाने आता महाराष्ट्राला काय दिले. कोणत्याही परिस्थितीत सर्वाच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या विरोधात निकाल देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिंदे गटातील आमदारांना दुसऱ्या पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही. आमदार आमच्या संपर्कात आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

दरम्यान, भाजपला शिवसेना फोडायची होती, मराठी माणसाला दुबळं करायचे होते. हे त्यांना तात्कालीक यश मिळाले असले तरी फार काळ फायदा होणार नाही असेही राऊत यांनी म्हटले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युती करणार आहे. त्याबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले की हा त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. शिवसेना स्वतंत्र लढेल की मविआमध्ये लढेल हे चर्चा करून ठरवू असेही त्यांनी सांगितले.

Share