राजभवनातच छातीत कळ, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचं निधन, राज्यपालही हळहळले

मुंबई : राजभवनात कार्यरत असलेले राजभवन सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळ यांचे निधन झाले. भुजबळ यांनी मुंबई आणि राज्यात इतर अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

भुजबळ कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व मनमिळावू अधिकारी होते. हसतमुख असलेले भुजबळ यांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपण एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याला मुकलो आहोत, या शब्दात राज्यपालांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

बुधवारी दुपारी राजभवन परिसरातील कार्यालयात असतानाच भुजबळ यांना छातीत दुखू लागले. इतर अधिकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे रुग्णालयात नेले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

Share