केदारनाथ,बद्रीनाथ मंदिराची दारं या तारखेला खुली होणार !

उत्तराखंड- महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर शिव भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 12 ज्योर्तिलींगापैकी एक असलेले सर्वात पवित्र धाम केदारनाथ आणि बद्रीनाथ या मंदिराचे कपाट येत्या मे महिन्यात उघडणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक पूजापाठानंतर केंदारनाथ बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली.

6 मे रोजी केदारनाथ आणि 8 मे रोजी बद्रीनाथ धाम मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे पीआरओ गौर यांनी सांगितले. ते म्हणाले की, उखीमठाहून केदारनाथ उत्सव यात्रा २ मे रोजी केदारनाथला निघणार आहे.

उखीमठ येथून ठरलेल्या वेळापत्रकानुसार भगवान श्री केदारनाथांची पंचमुखी उत्सव डोली २ मे रोजी पंचकेदार गद्दी येथील ओंकारेश्वर मंदिरातून केदारनाथसाठी निघेल. उखीमठ येथे भैरव पूजन एक दिवस आधी म्हणजेच १ मे रोजी होणार आहे. डोली 2 मे रोजी गुप्तकाशी, 3 मे रोजी फाटा, 4 मे रोजी गौरीकुंड आणि 5 मे रोजी केदारनाथ धाम येथे पंचमुखी डोली पोहोचेल. त्यानंतर शुक्रवार, 6 मे रोजी सकाळी 6.25 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील. मंगळवारी शिवरात्रीनिमित्त सकाळी ही घोषणा करण्यात आली आहे.

 

Share