नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार…?

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांवर सातत्याने आरोप करत  किरीट सोमय्या यानी धुरळा उडवून दिला आहे. पण आता किरीट सोमय्या यांना मोठा धक्का बसला आहे. किरीट सोमय्या यांचे पूत्र  नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालायने फेटाळला आहे. त्यामुळे आता नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरणी नील सोमय्या यांच्यावर शिवसेना खा. संजय राऊत यांनी आरोप यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी नील सोमय्या यांचा जामीन फेटाळून लावला आहे.

 

संजय राऊतांचे नेमके आरोप काय?

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. “ईडीवाले सुनो. सीबीआयवाले सुनो. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं. आणि त्याला लुबाडलं. आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. १०० कोटी घेतले. लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त ४.४ कोटी रुपयांनी केली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सोमय्या. निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, याची ताबडतोब चौकशी करुन निल सोमय्याला अटक करा”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Share