अक्का फाऊंडेशनच्या माध्यामातून दृष्टी अभियान आनंवाडीत संपन्न

लातूर : माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून अक्का फाऊंडेशनच्या दृष्टी अभियानाचे शिबीर आज शिरूर अनंतपाळ आनंदवाडी येथे पार पडले.

अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या नेत्र आरोग्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘दृष्टी अभियान’ च्या दुसऱ्या पर्वातील २४ वे शिबीर शिरूरअनंतपाळ तालूक्यातील आनंदवाडी येथे पार पडले. या शिबिरात एकूण ८८ नागरिकांची नेत्रतपासणीत व त्यातील १७ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. याप्रसंगी ५८ नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले आहे. ‘दृष्टी अभियान २.०’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु करण्यात आले असून ते माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयीजी यांची जयंती २५ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे.

यावेळी नागनाथ चलमले, भारतीय जनता युवा मोर्चा लातूर जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्र्वर चेवले, गणेश खरटमोल, माधव चलमले, भागवत गड्डीमे, दामोदर गव्हाणे, हणमंत परले, रणजीत मरे, लक्ष्मण नाटकरे, उपस्थित होते.

Share