सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विरोधात निर्णय घेणार नाही

नवी दिल्ली : सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली या बैठकीत सोयाबीन कापूस उत्पादकाच्या विरोधात कुठलाही निर्यण सरकार घेणार नाही असे आश्वासन दिल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.

यावर्षी अतिवृष्टी संततधार पावसाने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे अडचणीत सापडले शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षित मदत मिळू शकली नाही. दरम्यान पोल्ट्री लॉबीही सोयाबीनचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत आहे, तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही संघटना कापसाचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरत आहे. परंतू केंद्र सरकारने या दबावाला बळी न पडता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक परंतू केंद्र सरकारने या दबावाला बळी न पडता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे तुपकर म्हणाले.

बाजारात प्रत्यक्षात सध्या सोयाबीनला साडेपाच हजारांपर्यत भाव आहे. मात्र, उत्पादन खर्च सहा हजार आहे तर कापसाचा उत्पादन खर्च साडेआठ हजार असून मिळणारा भाव आठ ते साडे आठ हजार आहे. ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळणे आवश्यक असल्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली.

Share