मुंबई : कोरोना काळात आर्थिक तूट भरून काढणे राज्य सरकारला अशक्य होते. केंद्र सरकारने कोरोना काळात खासदारांचा विकास निधी बंद केला, मात्र महाविकास आघाडी सरकारने आमदारांच्या विकास निधीत वाढ केली. राज्यावर अनेक संकटे आली आहेत. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. देशाच्या पंतप्रधानांनी गुजरात राज्याचा विकास करण्याकडे लक्ष दिले. अनेक उद्योग मुंबईतून गुजरातला नेण्यात आले असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधी पक्षावर सडकुन टिका केली.
राज्यावर अनेक संकटे आली आहेत. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. देशाच्या पंतप्रधानांनी गुजरात राज्याचा विकास करण्याकडे लक्ष दिले. अनेक उद्योग मुंबईतून गुजरातला नेण्यात आले, असे म्हणत आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका केली.#Budget
— NCP (@NCPspeaks) March 14, 2022
पुढे बोलतान म्हणाले शिंदे म्हणाले की, निधी वाटपात कोणाला झुकत माप दिलं हे दाखवत विरोधक सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जितके प्रयत्न कराल तितके हे सरकार भक्कम होईल. कोरोना काळात विरोधकांनी दिल्लीत जाऊन सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्याच काळात राज्य सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आणि केवळ आरोग्य सेवा नाही तर सामान्य जनतेच्या पोटाची भूकही भागवली. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस जनतेकडून येणाऱ्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने केली, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीचे कौतुक राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे केले आहे.