मुख्यमंत्री सेनेचा पण राज्यात हिंदूना एकत्र करणे म्हणजे चोरी, भातखळकरांचा वळसे पाटालंना टोला

मुंबई- देशात बहूचर्चित आणि नुकतच प्रदर्शित झालेला ‘ द कश्मीर फाइल्स ‘ सध्या बाॅक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. सध्या हा चित्रपट विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश सरकारने टॅक्स फ्रीची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली होती. दरम्यान नुकतंच याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी उत्तर दिले आहे. या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केली त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला आहे.

भातखऴकर यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, काश्मीर फाईल्स चित्रपट बघितल्यावर काही लोक एकत्र येवून भाषण करतात असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे म्हणणे आहे. दिलीप वळसे पाटिल यांनी काल विधान सभेत या चित्रपटाविषयी चिंता व्यक्त केली होती. परंतू या राज्यात कायम हिंदूत्वाच्या बाजूने लढलेल्या शिवसेनेचा सध्या मुख्यमंत्री असताना हिंदूना एकत्र करणे म्हणजे या राज्यात चोरी करण्या सारखे आहे. अशी खोचक टिका भातखळकर यांनी केली आहे.

तसेच अनेक राज्यात आता हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात अजूनही हा चित्रपट कर मुक्त केलेला नाही त्यामुळे जनतेचे लक्ष राज्याच्या निर्णयाकडे लागून आहे. हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश , उत्तप्रदेश, त्रिपूरा, पंजाब या राज्यात हा चित्रपट कर मुक्त आहे.

Share