मुंबई- पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता.
ED arrested one Praveen Raut in connection with Rs 1034 crore land scam early this morning; Raut to be produced before the court today
— ANI (@ANI) February 2, 2022
एचडीआयएलमधील एक हजार ३४ कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर आता प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रविण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामधून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते आणि याचे पुरावे ईडीला मिळाले होते. त्यामुळे ईडीकडून अद्याप याप्रकरणी तपास सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?