केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची सायकलने संसदेत एन्ट्री !

दिल्ली- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. अधिवेशना दरम्यान अनेक घटना घडत असतात आणि त्याच्या चर्चा देखील जोरदार होतात. काही घटना लक्ष वेधून घेतात असाच काहीसा प्रकार आज सकाळी संसदेत पाहायला मिळाला. जेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे सायकलवरून संसदेत पोहोचले.

केंद्रीय आरोग्यमंत्री स्वत: सायकल चालवत संसदेत येत असताना, संसद आवारात उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या होत्या . एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया सायकलने संसद भवनात पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सायकलने संसदेत पोहोचले होते. मनसुख मांडविया हे पर्यावरणवादी आहेत. बऱ्याचदा ते कार ऐवजी सायकलचा वापर करणे पसंत करतात. बऱ्याचदा ते सायकलवरून संसदेत आलेले असल्याने त्यांना सायकलवाले खासदार या नावाने देखील संबोधले जाते. ते एकदा सायकलवरून राष्ट्रपती भवनाच्या कार्यक्रमाला देखील पोहोचले होते.

Share