गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे. मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. दीदींचं वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांची कारकिर्द-
लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. आज त्या तब्बल ९२ वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल ३६ भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये झाला आहे. त्या दीनानाथ मंगेशकर यांच्या मोठ्या लेक आहेत.

Share