मलिकांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही – फडणवीस

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद याच्या संबंधितांसोबत आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी ईडीने अटक केली आहे. यावर भाजपकडून आक्रमक भुमिका घेण्यात आली. तर दुसरीकडे ठाकरे सरकारने मलिकांच्या राजीनामा न घेण्याचं ठरवलं आहे. यामुळेच आज भाजपकडून मलिकांच्या राजीनान्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यातं आला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन निशाणा साधला.  जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाहीत? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय संघर्ष थांबणार नसल्याचं म्हटलं आहे. “हा देशद्रोह्याच्या विरोधात हा संघर्ष आहे. पाकिस्तानधार्जिण्या लोकांच्या विरोधात हा संघर्ष. जोपर्यंत बॉम्बस्फोटाचे आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. आम्ही काही रोज राजीनामे मागत नाहीत. ही घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Share